दिल्ली मद्यधोरण घोटाळा; आरोग्यमंत्र्यांच्या चौकशीपूर्वीच ४० ठिकाणी धाडी

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी विशेष सीबीआय न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी गुरुवारी ईडीला सत्येंद्र जैन यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. आता ईडी आज त्यांची चौकशी करणार आहे. न्यायालयाने ईडीच्या पथकाला तिहार तुरुंगातच चौकशी करण्यास सांगितले. जैन यांच्या चौकशीपूर्वीच ईडीकडून ४० ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

    नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरणावरून (Liquor Policy) गोंधळ सुरु आहे. त्यातच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ४० ठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच, हैदराबादमध्येही २५ ठिकाणी छापा सत्र सुरू आहे. मद्यधोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांची आज ईडी चौकशी करणार आहे.

    मद्य धोरण घोटाळाप्रकरणी विशेष सीबीआय (CBI) न्यायाधीश गीतांजली गोयल (Geetanjali Goyal) यांनी गुरुवारी ईडीला सत्येंद्र जैन यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. आता ईडी आज त्यांची चौकशी करणार आहे. न्यायालयाने ईडीच्या पथकाला तिहार तुरुंगातच चौकशी करण्यास सांगितले. जैन यांच्या चौकशीपूर्वीच ईडीकडून ४० ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

    ६ सप्टेंबरलाही ईडीने दिल्ली, यूपी, पंजाबसह अनेक राज्यांतील दारू व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. गुरुग्राम, लखनौ, हैदराबाद, मुंबई, बंगळुरूसह सुमारे ३५ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सीबीआय तपासासोबतच भाजप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करत आहे.