शिक्षिकेने मुलीला पहिल्या मजल्यावरून फेकले, 5वीच्या विद्यार्थिनीला कात्रीने मारले

यासंबंधीच्या वृत्तानुसार, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचेही जबाब उजेडात आलेत. एकाने सांगितले की, या शिक्षिकेने यापूर्वीही विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या घटनेनंतर शाळेत धाव घेतलेल्या पालकांनी शिक्षिकेवर वारंवार विद्यार्थ्यांना क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप केला.

    नवी दिल्ली – दिल्लीतील एका महिला शिक्षिकेने शुक्रवारी एका मुलीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून फेकले. मुलीवर हिंदूराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्याला जखम झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, मॉडल बस्तीच्या प्राथमिक शाळेत इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनीला शिक्षिका गीता देशवाल यांनी कात्रीने मारले. एवढेच नाही तर तिला पहिल्या मजल्यावरून धक्का मारून फेकून दिले. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारावर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यासंबंधीच्या वृत्तानुसार, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचेही जबाब उजेडात आलेत. एकाने सांगितले की, या शिक्षिकेने यापूर्वीही विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या घटनेनंतर शाळेत धाव घेतलेल्या पालकांनी शिक्षिकेवर वारंवार विद्यार्थ्यांना क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप केला. एका विद्यार्थ्याचा पालक म्हणाला – माझ्या मुलासोबतही मारहाण झाली. शिक्षिकेने मुलाला पहिल्या मजल्यावरून फेकल्यानंतर तो भीतीने शाळेतून पळून गेला. त्यानंतर इतर पालकही शाळेत पोहोचले. त्यांनी आपल्याकडे वर्गात सांडलेल्या रक्ताचा व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे.