कुत्रा भुकंत अंगावर आला तर घाबरला डिलिव्हरी बॉय, तिसऱ्या मजल्यारुन थेट खाली मारली उडी, आता जर्मन शेफर्डच्या मालकिणीवर गुन्हा

डिलिव्हरीसाठी (Delivery) गेलेल्या तरुणावर घरातील कुत्रे (Dog0 भुंकत धावून आल्यानं, घाबरलेल्या डिलिव्हरी बॉयनं (Delivery Boy) तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यात डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला आहे. या पीडित तरुणाचं नाव मोहम्मद रिजवान असं असून त्याचं वय केवळ २३ वर्ष आहे.

    हैदराबाद : डिलिव्हरीसाठी (Delivery) गेलेल्या तरुणावर घरातील कुत्रे (Dog0 भुंकत धावून आल्यानं, घाबरलेल्या डिलिव्हरी बॉयनं (Delivery Boy) तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यात डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला आहे. या पीडित तरुणाचं नाव मोहम्मद रिजवान असं असून त्याचं वय केवळ २३ वर्ष आहे. मोहम्मद स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करतो. हैदराबादच्या बंजारा हिल्स या उच्चभ्रू परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये रिजवान पार्सल देण्यासाठी गेला होता. रिजवान हा हैदराबादमधील श्रीराम नगरचा रहिवासी आहे. या अपघातानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतय. रिजवानचा भाऊ मोहम्मद ख्वाजा यामे या प्रकरणात बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

    नेमका का घाबरला रिजवान?

    बंजारा हिल्स परिसरात राहत असलेल्या शोभना यांना फूड पार्सल देण्यासाठी रिजवान अपार्टमेंटमध्ये गेला होता. दरवाजा उघडताच ११ वर्षाचा जर्न शेफर्ड भुंकत त्याच्या अंगावर आला. घाबरलेल्या रिजवानने तिथून पळून जाण्याच्या प्रयत्न केला, मात्र कुत्रा त्याच्यामागे धावला. रिजवानला पुढं जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळं त्यानं थेट तिसऱ्या मजल्यावरुन उडीच मारली. घाबरलेल्या रिजवाननं तिसऱ्या मजल्यावरुन मारलेल्या उडीमुळं एकच गोंधळ उडाला. ग्राहक शोभना यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या धावत खाली आल्या. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रिजवान त्यांना दिसला. त्यांनी तातडीनं रिजवानला निम्समध्ये दाखल केलं. रिजवानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत.

    मालकीण शोभनाच्या विरोधात गुन्हा दाखल

    रिजवान गेल्या ३ वर्षांपासून डिलिव्हरी एजेंट म्हणून काम करतो. त्याच्या भावानं दाखल केलेल्या तक्रारीनंतर जर्मन शेफर्डची मालकीण असलेल्या शोभनावर दुसऱ्याची सुरक्षा धोक्यात आणल्या प्रकरणी आणि जनावरांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.