इथे रोज लोकशाहीची हत्या होत आहे…राहुल गांधीचा सरकारवर घणाघात

देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. काँग्रेसनं (congress) जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं (BJP) 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

    महागाईविरोधात आज काँग्रेसकडून देशभरात केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महागाई, जीएसटी, केंद्र सरकारच्या धोरणांवर सरकार सडकून टिका केली. ‘तुम्ही हुकूमशाही उपभोगत आहात का, इथे रोज लोकशाहीची हत्या होत आहे. या सरकारने 8 वर्षात लोकशाही उध्वस्त केली. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

    देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. काँग्रेसनं (congress) जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं (BJP) 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

    राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. राहुल गांधी म्हणाले की, जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही. महागाईबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही. ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे. सरकारचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. 5 दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार म्हणत आहेत की हे सर्व खोटे आहे. बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधनं आहेत, असंही ते म्हणाले.