महापुरुषांच्या मूर्ती अडवल्या जात नाहीत, तिरुपती देवस्थानचे धर्मा रेड्डी

तिरुमला, तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांनी देवस्थान परिसरात हिंदू देवतांची व महापुरुषांच्या मूर्ती अडवल्या जात नसल्याचे सांगून हा गैरसमज असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आदरपूर्वक स्वीकारली.

    नवी दिल्ली – महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेले वाहन टोल नाक्यांवर अडवण्यात येत असल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर तिरुमला, तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांनी देवस्थान परिसरात हिंदू देवतांची व महापुरुषांच्या मूर्ती अडवल्या जात नसल्याचे सांगून हा गैरसमज असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आदरपूर्वक स्वीकारली.

    धर्मा रेड्डी म्हणाले, पंधरा, वीस दिवसांपासून एक, दोन लोक तिरुमलामध्ये शिवाजी महाराजांच्या मुर्तीला आणू दिले जात नाही, याबाबत व्हिडीओ व्हायरल करीत आहेत, हे चुकीचे आहे. तिरुपती देवस्थान खूप मोठी हिंदु संस्था आहे. हिंदु, देवता मुर्ती आणि हिंदु धर्मासाठी जेही कार्य कुणी केले त्यांच्या मुर्ती अथवा चिन्ह घेऊन येण्यास मनाई केली जात नाही. राजकीय प्रचाराला मात्र अनुमती नाही.