
खुशबू सुंदर यांनी 2018 मध्ये काँग्रेस पक्षात असताना पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे बघावं तिकडे मोदी, पण मोदी म्हणजे नेमकं काय? प्रत्येक मोदी नावाच्या पूर्वी भ्रष्टाचार शब्द लिहिला जातो. मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, असे ट्वीट खुशबू सुंदर यांनी केले होते.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचं मोदी (Modi) आडनावासंदर्भात केलेलं एक जुनं ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेसने (Congress) यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींप्रमाणेच आता खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांच्यावरही कारवाई होणार का? असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
I will not delete my tweet. It’s out there. There are many more. Pls use your time, as CONgress is absolutely jobless, to dig out a few more. BTW I like to see how the CONgress is putting me and @RahulGandhi on the same platform. I like the fact that I have earned enough name n…
— KhushbuSundar (@khushsundar) March 25, 2023
दरम्यान, यासदंर्भात स्वत: खुशबू सुंदर यांनी सांगितलं की,“ मी ते ट्वीट डिलीट करणार नाही. ते तिथेच राहील. अजूनही काही अशी ट्वीट आहेत. तुमचा वेळ चांगल्या कामासाठी वापरा, काँग्रेसकडे काही काम उरलेलं नाही. माझी आणि राहुल गांधींची तुलना ते करत असतील तर मला बघायला आवडेल. कारण त्याचा अर्थ मी तितकं नाव कमावलं असा होईल’, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच माझं पंतप्रधान मोदींबद्दल मतपरिवर्तन झाल्यानेच मी भाजपात प्रवेश केला होता, असेही त्या म्हणाल्या.
Yahan #Modi wahan #Modi jahan dekho #Modi..lekin yeh kya?? Har #Modi ke aage #bhrashtachaar surname laga hua hai..toh baat ko no samjho..#Modi mutlab #bhrashtachaar..let’s change the meaning of #Modi to corruption..suits better..#Nirav #Lalit #Namo = corruption..👌👌😊😊
— KhushbuSundar (@khushsundar) February 15, 2018
खुशबू सुंदर यांनी 2018 मध्ये काँग्रेस पक्षात असताना पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे बघावं तिकडे मोदी, पण मोदी म्हणजे नेमकं काय? प्रत्येक मोदी नावाच्या पूर्वी भ्रष्टाचार शब्द लिहिला जातो. मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, असे ट्वीट खुशबू सुंदर यांनी केले होते. दरम्यान, खुशबू सुंदर यांच्या व्हायरल ट्वीटरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी आता आपल्या मोदी नावाच्या शिष्याद्वारे खुशबू सुंदर यांच्यावर मानहानीचा दाखल करतील का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता.