एक निश्चित रक्कम देऊन, लोकं या प्राणी संग्रहालयातील वन्य प्राणी दत्तक घेऊ शकतील, आणि त्या रकमेवर दत्तक घेणाऱ्यांना आय़करातून सूटही मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी याच योजनेत अभिनेत्री प्रियंका चोप्राने अनुष्का आणि दुर्गा नावाच्या दोन वाघिणी आणि सुंदरी नामक एक सिंहीण दत्तक घेतली आहे. आता प्राण्यांच्या संगोपनासाठी पुन्हा एकदा संग्रहालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
रांची – बातमीचे शिर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल ना, पण तुम्हीही आता वन्य प्राणी दत्तक घेऊ शकाल. ५ लाख रुपयांत हत्ती, ३ लाखांत वाघ किंवा सिंह, एका लाखात अस्वल तर २५ हजारात मोराला तुम्ही आपले म्हणू शकाल. रांचीच्या ओरमांझीतील बिरसा मुंडा वन्यजीव प्राणी उद्यानात ही आकर्षक योजना सुरु करण्यात आली आहे.
एक निश्चित रक्कम देऊन, लोकं या प्राणी संग्रहालयातील वन्य प्राणी दत्तक घेऊ शकतील, आणि त्या रकमेवर दत्तक घेणाऱ्यांना आय़करातून सूटही मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी याच योजनेत अभिनेत्री प्रियंका चोप्राने अनुष्का आणि दुर्गा नावाच्या दोन वाघिणी आणि सुंदरी नामक एक सिंहीण दत्तक घेतली आहे. आता प्राण्यांच्या संगोपनासाठी पुन्हा एकदा संग्रहालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
वन्यजीव प्रेमी एक ठराविक रक्कम देऊन, इथल्या प्राण्यांना वर्षभरासाठी दत्तक घेऊ शकणार आहेत. या मदतीमुळे या प्राण्यांचे चांगले संगोपन करणे प्राणी संग्रहालयाला शक्य होणार आहे. तसेच ही मदत करणाऱ्यांना आयकरातून सूचही मिळणार आहे.
इतकंच नाही जर कुणी हे वन्य प्राणी दत्तक घेतले, तर त्यांचे नाव या प्राण्यांच्या पिजऱ्याबाहेर बोर्डवर लावण्यात येईल, तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्म वर्षभर प्राणी संग्रहालयात निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे.
या प्राणी संग्रहालय़ात हत्ती, वाघ, सिंह, घोडे, चित्ते, हिमालयातील अस्वले, चितळ, कोल्हे, साप यासह अनेक प्राण्यांना दत्तक देण्याची ही योजना आहे. या योजनेतून मिळणारे पैसे हे या प्राण्यांचा उपचार, प्रशिक्षणावर खर्च करण्यात येणार आहेत.