Nitin Gadkari

ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकजवळ याबाबची माहिती एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येईल. लायसनच्या चाचणीसाठी बूकिंग अपॉइंटमेंट घेतल्यानंतर उमेदवारांना या व्हिडीओची लिंकही देण्यात येते. ड्रायव्हिंगच्या लायसनसाठी आणि नोंदणी प्रणापत्रासाठी काही सेवा पुरवताना प्रतिज्ञापत्र पुरेसं ठरेल. आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या मदतीने सर्व सेवा ऑनलाइन दिल्या जात आहेत असंही गडकरींनी सांगितलं.

    नवी दिल्ली :आरटीओ कार्यालय आणि लायसन्स हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अलिकडे ऑनलाइन लर्निंग लायसन्समुळे सुटसुटीतपणा आला असला, तरी लायसन्स मिळवण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया आणि टेस्ट पार पाडाव्या लागतात.ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता कठीण टेस्ट पास करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामर्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती गुरुवारी लोकसभेत दिली.

    अशी असेल परीक्षा

    ज्यांना टेस्ट मध्ये ६९ टक्के गुण मिळतील त्यांनाच लायसन्स दिलं जाईल. तसंच तीन आणि चार चाकी वाहने रिव्हर्स घेताना चालकांचे वाहनांवर चांगलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी चालकाकडे कौशल्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे लायसन्सची चाचणी कठीण करण्यात आली आहे. यामध्ये रिव्हर्स गिअर असलेल्या गाड्या मागे घेणं, डावीकडे – उजवीकडे कमी जागा असताना न अडखळता गाडी मागे घेता आली पाहिजे. यासर्व बाबींवर चालकाची चाचणी घेतली जाईल असंही गडकरींनी सांगितलंय.

    मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदीनुसार हे सर्व आहे. ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकजवळ याबाबची माहिती एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येईल. लायसनच्या चाचणीसाठी बूकिंग अपॉइंटमेंट घेतल्यानंतर उमेदवारांना या व्हिडीओची लिंकही देण्यात येते. ड्रायव्हिंगच्या लायसनसाठी आणि नोंदणी प्रणापत्रासाठी काही सेवा पुरवताना प्रतिज्ञापत्र पुरेसं ठरेल. आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या मदतीने सर्व सेवा ऑनलाइन दिल्या जात आहेत असंही गडकरींनी सांगितलं.