dr gaurav gandhi

डॉ. गौरव गांधी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अवघ्या 41व्या वर्षी डॉ. गौरव गांधी यांच्या जाण्याने कुटंबियांना आणि त्यांच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    जामनगर: गुजरातच्या जामनगर (Jamnagar) शहरातील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर गौरव गांधी (Dr Gaurav Gandhi Death) यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी 16000 पेक्षा जास्त रुग्णांच्या ह्रदयाचं ऑपरेशन केलं होतं. ते घरी त्यांच्या कुटुंबियांना गंभीर अवस्थेत दिसले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. (Dr Gaurav Gandhi)

    डॉ. गौरव गांधी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अवघ्या 41व्या वर्षी डॉ. गौरव गांधी यांच्या जाण्याने कुटंबियांना आणि त्यांच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.(Gujrat News)

    डॉ. गौरव गांधी नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री रुग्णांची तपासणी करुन घरी गेले. रात्रीचं जेवण करून ते झोपले. सकाळी त्यांच्या घरातील माणसं त्यांना उठवण्यासाठी आली मात्र डॉ. गांधी त्यांना गंभीर अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी गांधी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं  सांगितलं.

    16000 हार्ट सर्जरी करणारे कार्डियोलॉजिस्ट
    डॉ. गौरव गांधी गुजरातमधील खूप प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी आतापर्यंत 16 हजारांहून अधिक रुग्णांच्या हार्ट सर्जरी केल्या होत्या. हजारो रुग्णांना त्यांनी सर्जरीद्वारे जीवदान दिलं होतं. मात्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा जीव गेला. डॉक्टर गौरव गांधी यांनी जामनगरमध्ये एमबीबीएसचं डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये कार्डियोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलं. पुढे मग ते जामनगरला परत आले आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. जामनगरमध्ये त्यांनी कार्डियोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. ते फेसबुकवरच्या ‘हॉल्ट हार्ट अटॅक कॅम्पेन’ चंही काम करत होते. ‘हॉल्ट हार्ट अटॅक कॅम्पेन’ देशात हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूसंदर्भात जनजागृती मोहीम म्हणून चालवलं जात होतं. लोकांना ते हार्ट अटॅकपासून वाचवण्यासाठी काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन करायचे. मात्र लोकांसाठी झटणाऱ्या हार्ट अटॅकसंदर्भात जनजागृती करणाऱ्या आणि 16 हजारांहून अधिक रुग्णांच्या हार्ट सर्जरी  करणाऱ्या डॉक्टर गौरव गांधींचं हार्ट अटॅकमुळेचं निधन झालं. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.