राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांनी भरला अर्ज, मोदी-शहांसह ७ मोठे नेते बनले प्रस्तावक

द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, लालन सिंह, पशुपती पारस, रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद हे प्रस्तावक होते. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मुर्मू यांनी संसदेतील महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली.

    नवी दिल्ली – झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी आज NDAच्या वतीने राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

    द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, लालन सिंह, पशुपती पारस, रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद हे प्रस्तावक होते. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मुर्मू यांनी संसदेतील महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली.

    याआधी गुरुवारी द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी प्रस्तावक व समर्थक म्हणून नामनिर्देशनपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.