‘रालोआ’कडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू; तर यशवंत सिन्हा ‘संपुआ’चे उमेदवार

झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. यावेळी आदिवासी महिलेला (Tribal Woman) संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) वतीने भाजपने (BJP) राष्ट्रपती निवडणुकीसाठी (Presidential Election) उमेदवार जाहीर केला आहे. झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. यावेळी आदिवासी महिलेला (Tribal Woman) संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

    भाजपने राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी बैठक घेतली आणि उमेदवार जाहीर केला. त्यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीने (UPA) यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख २९ जून असून सदर निवडणूक बिनविरोध (Unopposed) करण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, विरोधी पक्षांनीदेखील उमेदवार जाहीर केला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्या संसंदीय बोर्डाची बैठक पार पडली.

    द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. पूर्व भारतातील महिला तथा आदिवासी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे नड्डा यांनी सांगितले. मुर्मू या ओडिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. २०१७ मध्येदेखील द्रौपदी मुर्मू यांचे नाव चर्चेत होते. मात्र, भाजपने त्यावेळी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती.