heroine

दिल्लीतून (Delhi) ४३४ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त (434 Crore Heroin Seized In Delhi) करण्यात आले आहे. हे हेरॉईन सुमारे ६२ किलो असल्याची माहिती मिळाली आहे.

    दिल्ली :  डीआरआयने (The Directorate of Revenue Intelligence) दिल्लीतून (Delhi) ४३४ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त (434 Crore Heroin Seized In Delhi) केले आहे. सुमारे ६२ किलो हेरॉईन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण माल एका एअर कार्गोने पकडला होता. या एअरकार्गो मॉड्युलमधून जप्त करण्यात आलेली ही सर्वात मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई आहे.

    या ड्रग्सची डीआरआयला गुप्तचर माहिती मिळाली होती. त्यानंतर १० मे रोजी एक ऑपरेशन करण्यात आले, ज्याला ब्लॅक अँड व्हाईट असे नाव देण्यात आले. पथक घटनास्थळी पोहोचले असता येथील एका मालवाहूतून हे ५५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. अंमली पदार्थांची ही मोठी खेप युगांडातून दुबईमार्गे दिल्लीला नेण्यात आली.

    एअर कार्गोमधून ५५ किलो हेरॉईन पकडल्यानंतर डीआरआयच्या पथकाने एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यानंतर या व्यक्तीच्या चौकशीच्या आधारे हरियाणा आणि लुधियाना येथे छापे टाकण्यात आले. या छाप्यात ७ किलो हेरॉईन आणि ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यानंतर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो. ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी करण्यात येत आहे.