drug peddler family burnt in rajasthan copy

पंजाबच्या अबोहर येथील ड्रग्ज माफिया मुकुंद सिंह आणि त्याचा मुलगा शारद सिंह हे बुधवारी दुपारी ड्रग्ज विकण्यासाठी हनुमानगढला आले. जगवीर सिंह याच्या गल्लीतच ते माल विकत होते. जगवीरने त्यांना मनाई केली तर या बाप-लेकांनी त्याला बघून घेऊ अशी धमकीच दिली. त्यानंतर गुरुवारी पहाटे या बाप-लेकांनी जगवीर राहत असलेल्या घरात दरवाज्याच्या खालून पेट्रोल टाकले आणि आग लावली.

  हनुमानगढ: राजस्थानात माफिया राज मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. हत्यारांची तस्करी असो वा ड्रग्ज विकणाऱ्यांचं रॅकेट (Drugs Racket) असो गुन्हेगार दिवसेंदिवस अधिकाधिक मुजोर होताना दिसतायेत. राजस्थानचे पोलीस (Rajasthan Police) हे सगळं रोखण्यात अपयशी ठरतायेत, हेही स्पष्ट आहे. हनुमानगढमध्ये (Hanumangadh) याचंच एक ह्रदयद्रावक प्रकरण उघड झालंय. या ठिकाणी ड्रग्ज विकण्यास दिलेल्या एका जुन्या पेडलरला जिवंत जाळण्याचा (Drug Peddler Burnt Alive) प्रकार घडलाय. त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्यात आलंय. मुजोर झालेल्या ड्रग्ज माफियांनी हे भयानक कृत्य केलंय. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज माफिया आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.

  नेमका काय घडला प्रकार ?
  हे सगळं प्रकरण हनुमानगढ जिल्ह्यात पीलीबंगा या गावात घडलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी जगवीर उर्फ मद्दी हेरॉईन विकण्याचे काम करीत होता. पंजाबमध्ये राहणाऱ्या एका माफियाकडून तो माल मागवित असे. फोनवर हे सगळे व्यवहार होत. डिलिव्हरी हवी त्या ठिकाणी होत असे, बदल्यात पैसेही पोहचवण्यात येत असत. जगवीरच्या भावानं पोलिसांना साांगितलं होतं की त्यानं आता हे काम सोडलंय आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन त्यानं हा निर्णय घेतला होता. मात्र ड्रग्ज तस्कारांना हे अमान्य होतं.

  संपूर्ण कुटुंबालाच जिवंत जाळलं
  पंजाबच्या अबोहर येथील ड्रग्ज माफिया मुकुंद सिंह आणि त्याचा मुलगा शारद सिंह हे बुधवारी दुपारी ड्रग्ज विकण्यासाठी हनुमानगढला आले. जगवीर सिंह याच्या गल्लीतच ते माल विकत होते. जगवीरने त्यांना मनाई केली तर या बाप-लेकांनी त्याला बघून घेऊ अशी धमकीच दिली. त्यानंतर गुरुवारी पहाटे या बाप-लेकांनी जगवीर राहत असलेल्या घरात दरवाज्याच्या खालून पेट्रोल टाकले आणि आग लावली.

  ५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  या जळीत कांडात जगवीर, त्याची पत्नी आणि मुलगा एकमजीत हे जिवंत जळाले आहेत. एकमजीत याचा मृत्यू झाला असून पत्नीची परिस्थिती गंभीर आहे. जगवीरलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पंजाबचे डे ड्रग्ज तस्कर या घटनेतंर पंजाबात पळून गेले होते. त्यानंतर त्यांना पंजाबमधून अटक करण्यात आलीय. या दोघांना राजस्थानात आणण्यात आलं असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.