takht express

अमृतसरचा रहिवासी असलेले राजेश त्यांच्या पत्नीसह अकाल तख्त एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते. रात्री 12 च्या सुमारास पत्नी तिच्या कोचवर झोपलेली होती. त्याचवेळी बिहारचा टीटी मुन्ना कुमार यानं या महिलेच्या तोंडावर लघवी केली. यानंतर जाग्या झालेल्या पत्नीनं जोरात ओरडायला सुरुवात केली.

लखनौ: अमृतसरवरुन कोलकत्याला (Amritsar To Kolkata) जाणाऱ्या अकाल तख्त एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री लज्जास्पद प्रकार घडला. ट्रेनमध्ये असलेल्या एका टीटीनं एका महिला प्रवाशाच्या चेहऱ्यावर लघुशंका (Drunk TT Urinated On Woman Face) केली. महिलेनं यानंतर घातलेल्या गोंधळानंतर टीटीला पकडण्यात आलं. या महिलेच्या पतीनं या मद्यधुंद टीटीला सोमवारी पहाटे रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं, त्यानंतर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) या टीटीला अटक केली, आता त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आलेली आहे. टीटीनं हे कृत्य केलं त्यावेळी त्याने जास्त दारु ढोसली होती. नुकतीच अशीच घटना फ्लाईटमध्ये घडली होती. त्याची पुनरावृत्ती आता ट्रेनमध्ये होतेय. अशा घटना रोखायच्या कशा असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

रात्री 12 च्या सुमारास घडला प्रकार
अमृतसरचा रहिवासी असलेले राजेश त्यांच्या पत्नीसह अकाल तख्त एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते. रात्री 12 च्या सुमारास पत्नी तिच्या कोचवर झोपलेली होती. त्याचवेळी बिहारचा टीटी मुन्ना कुमार यानं या महिलेच्या तोंडावर लघवी केली. यानंतर जाग्या झालेल्या पत्नीनं जोरात ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर कोचमध्ये असलेल्या प्रवाशांनी टीटी मुन्नाकुमारला मारहाण केली आणि त्याला पकडून ठेवलं. मुन्नाकुमार प्रचंड दारु प्यायलेला होता, असं प्रवाशांनी सांगितलं आहे. आता मुन्नाकुमारला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिलीय.

फ्लाईटमध्येही घडला होता असाच प्रकार
फ्लाईट आणि ट्रेनमध्ये अशा घटना वारंवार का घडतायेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नुकतीच अशीच घटना फ्लाईटमध्ये झाली होती. न्यूयॉर्कवरुन दिल्लीला येणाऱ्या अमेरिकव एयरलाईन्समध्ये नशेत असलेल्या एका व्यक्तीनं शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या अंगावर लघवी केली होती. तर याच वर्षी एयर इंडियाच्या एका विमानात न्यूयॉर्कवरुन दिल्लीत येणाऱ्या फ्लाईटमध्येही असाच प्रकार घडला होता. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या शंकर मिश्रा याने एका वयस्कर महिलेच्या अंगावर लघवी केली होती. त्यानंतर शंकर मिश्राला याला अटक करण्यात आली होती. तसचं 4 महिने त्याच्या एयर इंडिया विमानातून प्रवासावर बंदीही घालण्यात आली होती.