लॉकडाऊन काळात ८१ दशलक्ष लोकांनी गमावले रोजगार

जगातील अनेक देशात कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. पुरुषापेक्षा जास्त नोकऱ्या महिलांनी गमाल्या आहेत. तरुण वर्गांवरही या संकटाचा परिणाम झाल आहे. त्यांनीही या संकटात आपल्या नोकऱ्या गमावल्या.

  • एपीईएसओ-२०२० या अहवाल

हैदराबाद. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘आशिया प‌ॅसफिक इम्प्लॉयमेंट आणि सोशल आऊटलुक २०२०’ या अहवालानुसार ८१ दशलक्ष लोकांना आपल्या नोकऱ्यांपासून हात धुवावे लागले आहे. बँकॉकमध्ये कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात कामाच्या तासात घट झाली. त्याचा परिणाम नोकऱ्या आणि उत्पन्नावर पडल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. आर्थिक वाढ कमी झाल्याने वाढत्या कामगार शक्तीसाठी नवीन रोजगारनिर्मिती नाही.

देशांतर्गत उत्पादनात ३ टक्के तोटा

जगातील अनेक देशात कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. पुरुषापेक्षा जास्त नोकऱ्या महिलांनी गमाल्या आहेत. तरुण वर्गांवरही या संकटाचा परिणाम झाल आहे. त्यांनीही या संकटात आपल्या नोकऱ्या गमावल्या. या संकटाचा मध्यमवर्गीय लोकांवर जास्त परिणाम झाला. एकंदरीत, २०२० च्या पहिल्या तीन तिमाहीत आशिया-पॅसिफिक प्रदेशात कामगारांच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे, एकूण देशांतर्गत उत्पादनात ३ टक्के तोटा झाला आहे. तसेच कार्यरत दारिद्र्य पातळीमध्येही वाढ झाली आहे. अहवालातील प्राथमिक अंदाजानुसार २२ दशलक्ष ते २५ दशलक्ष लोक गरीबीत ढकलले जाऊ शकतात.