भूकंपाने हादरलं नेपाळ, रिश्टर स्केलवर तीव्रता 6.1, दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के!

रविवारी सकाळी भूकंपाने नेपाळ हादरला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

    रविवारी सकाळी भूकंपाने नेपाळ हादरला. रिश्टर स्केलवर भुकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचे केंद्र धाडिंगमध्ये होते. हे राजधानी काठमांडूच्या पश्चिमेला सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे.
    युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंप 13 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपामुळे कोणाचा मृत्यू किंवा नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बागमतीसह गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही हा धक्का जाणवला.
    यापुर्वी 16 ऑक्टोबर 2015 मध्ये रोजी नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवरह या तीव्रता 7.8 इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपातसुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला होता. सरकारच्या आपत्तीनंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA)अहवालात नमूद केल्याप्रमाणे, नेपाळ हा जगातील ११व्या क्रमांकाचा भूकंपप्रवण देश आहे.

    महिन्याच्या सुरुवातीस अफगाणिस्तानमध्ये भूंकप

    8 ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या हेरातमधे भूकंप झाला. यामुळे जेंदा जान जिल्ह्यातील चार गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, ६.३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या उत्तर-पश्चिमेस ४० किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर ५.५ रिश्टर स्केलचा हादराही जाणवला. सर्वेक्षणाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेला नकाशा या प्रदेशात सात भूकंप दर्शवण्यात आले आहेत.