coronavirus outbreak india cases news and updates 31 december 2020 nrvb

भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवला. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नववर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राजधानीत भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे.

    नवी दिल्ली – NCRमध्ये मंगळवारी दुपारी 2.28 वा. 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात जवळपास 30 सेकंद जोरदार झटके बसले. भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवला. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नववर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राजधानीत भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे. या भूकंपाचा प्रभाव दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश व हरियाणाच्या काही भागात जाणवले.

    यापूर्वी 5 जानेवारी सायंकाळी 7.56 मिनिटांनी दिल्ली-एनसीआर व काश्मीरमध्ये भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.9 नोंदवण्यात आली. त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या फैजाबादहून 79 किमी दूर हिंदूकुश पर्वत रांगांत होते.