भूकंपाच्या धक्क्याने कारगिल-लडाख हादरले; ४.३ तीव्रता

लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता सुमारे ४.३ होती. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.

    श्रीनगर : हिमालयालगतच्या (Himalaya) प्रदेशात नेहमीच भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत असतात. त्यातच काश्मिरात भूकंप होत असल्याचे जाणवते. आज सकाळी देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत.

    लडाखमध्ये (Ladakh) आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता (Earthquake intensity) सुमारे ४.३ होती. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.