एका अधिकाऱ्यासाठी सरकारने आणला अध्यादेश, S K मिश्रा सर्वात यंग IT अधिकारी

१९८४ च्या बॅचचे प्राप्तिकर कॅडरचे अधिकारी एस के मिश्रा यांची १९ नोव्हेंबर २०१८ रोजी EDच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. नियमांनुसार, ईडी प्रमुखांचा कार्यकाळ २ वर्षांचा असतो. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ १९ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आला. पण सरकारने १३ नोव्हेंबर २०२० रोजी त्यंचा कार्यकाळ वर्षभरासाठी वाढवला.

    नवी दिल्ली – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अंमलबजावणी संचालनालय अर्थात EDचे संचालक एस के मिश्रा यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षाने वाढवला आहे. ६० वर्षीय संजय कुमार मिश्रा आता या पदावर नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहतील. केंद्राने सलग तिसऱ्यांदा त्यांचा सेवाविस्तार केला आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने या विस्तारावर आक्षेप घेतला होता. पण सरकारने आता त्यांच्यासाठी खास वटहुकूम जारी केला आहे.

    १९८४ च्या बॅचचे प्राप्तिकर कॅडरचे अधिकारी एस के मिश्रा यांची १९ नोव्हेंबर २०१८ रोजी EDच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. नियमांनुसार, ईडी प्रमुखांचा कार्यकाळ २ वर्षांचा असतो. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ १९ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आला. पण सरकारने १३ नोव्हेंबर २०२० रोजी त्यंचा कार्यकाळ वर्षभरासाठी वाढवला.

    मिश्रा सेवा विस्तार मिळणारे ईडीचे पहिले डायरेक्टर आहेत. त्यानंतर २०२१ मध्ये केंद्राने सीबीआय व ईडीच्या संचालकांचा कार्यकाळ २ वर्षांनंतरही ३ वर्षांपर्यंत वाढवण्याचा एक वटहुकूम जारी केला. त्यानुसार मिश्रा यांना नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा सेवा विस्तार मिळाला आहे.