दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीने ठोकले टाळे

मागील काही दिवसांपासून अधिक सक्रिय झाल्या आहेत. देशात विशेषता पश्चिम बंगाल, महाराष्ट्र बिगर भाजपा (BJP) राज्यात ईडी तसेच केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला नॅशनल हेराल्ड प्रकरण (National Herald case) चांगलेच चर्चेत आहे. आता ईडीने दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयाला (National Herald office) टाळे ठोकले आहे.

    नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) (ED) मागील काही दिवसांपासून अधिक सक्रिय झाल्या आहेत. देशात विशेषता पश्चिम बंगाल, महाराष्ट्र बिगर भाजपा (BJP) राज्यात ईडी तसेच केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला नॅशनल हेराल्ड प्रकरण (National Herald case) चांगलेच चर्चेत आहे. आता ईडीने दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयाला (National Herald office) टाळे ठोकले आहे.

    दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरण सोनिया गांधींना ईडीने (Sonia Gandhi) नोटीस पाठवत दोन वेळा चौकशीला बोलावले होते. तसेच मंगळवारी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान, आज ईडीने दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर पूर्व परवानगीशिवाय कार्यालय उघडू नये असे आदेश सुद्धा दिले आहेत. अशी माहिती एएनआयने दिली आहे.