भोपाळ आणि गोव्यातील कारवान रिसॉर्टच्या मालकाच्या जागेवर ईडीचे छापे, ८८ लाखांहून अधिक रोकड सापडली

पनामा पेपर्स लीक प्रकरणात शिंदे यांचे नाव जोडले गेले होते. आतापर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये ८८ लाख ३० हजारांहून अधिक रुपयांची रोकड सापडली आहे. ईडीने काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. तपास सुरूच आहे.

    नवी दिल्ली – भोपाळमधील आरपीएम सोनिक अॅडव्हेंचर अँड कॅरव्हान रिसॉर्टचे मालक संजय विजय शिंदे यांच्या घरावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने छापा टाकला. संजय विजय शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने भोपाळ आणि गोव्यातील चार ठिकाणी छापे टाकले आहेत.

    पनामा पेपर्स लीक प्रकरणात शिंदे यांचे नाव जोडले गेले होते. आतापर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये ८८ लाख ३० हजारांहून अधिक रुपयांची रोकड सापडली आहे. ईडीने काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. तपास सुरूच आहे. पोलिसांनी संजय शिंदे याला अटक केली आहे. ब्रिटीश व्हर्जिन आयलंड आणि सिंगापूरमधील बँकांसह जगातील विविध बँकांमध्ये संजयच्या एकूण 31 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.