हा काय चमत्कार म्हणायचा? कोरोना लस घेताच न बोलणारी व्यक्ती खडाखडा बोलायला लागली आणि…

कोरोना लसीबाबत अनेकांच्या मनात आजही अनेक शंका आहेत. शारीरिक दुष्परिणामांच्या भीतीपोटी अनेकांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही. मात्र, जगण्याची आस सोडून दिलेल्या व्यक्तीचे आयुष्यच कोरोना लस घेतल्यामुळे बदलून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील सलगाडीह या गावात घडली आहे(Effect and Side Effects of Corona Vaccine).

  बोकोरो : कोरोना लसीबाबत अनेकांच्या मनात आजही अनेक शंका आहेत. शारीरिक दुष्परिणामांच्या भीतीपोटी अनेकांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही. मात्र, जगण्याची आस सोडून दिलेल्या व्यक्तीचे आयुष्यच कोरोना लस घेतल्यामुळे बदलून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील सलगाडीह या गावात घडली आहे(Effect and Side Effects of Corona Vaccine).

  येथे राहणारे दुलारचंद मुंडा यांचा पाच वर्षांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. उपचारानंतर ते बरे झाले, मात्र त्यांच्या अवयवांची हालचाल मंदवली होती. तसेच त्यांना नीट बोलताही येत नव्हते. अपघात झाल्यापासून त्यांचे बोलणेच बंद झाले होते. बोलायचा प्रयत्न केला तरी ते खूपच अडखळत बोलत असत. तसेच वर्षभरापासून ते अथंरुणाला खिळून होते. मुंडा कुटुंबात एकटेच कमावणारे होते. यामुळे त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा होता.

  कोविशील्ड घेतल्यानंतर बदलले जीवन

  अंथरुणाला खिळल्यामुळे जगण्याची आशा सोडून दिलेल्या मुंडा यांना सलगाडीह गावातील अंगणवाडी केंद्राकडून 4 जानेवारीला कोविशील्ड लस देण्यात आली. त्यानंतर 5 जानेवारीपासून त्यांच्या अवयवांची हळूहळू हालचाल होऊ लागली. तसेच ते न अडखळता घडाघडा बोलू लागले. कोविशील्डची लस घेतल्यानंतर त्यांचे जीवनच बदलून गेले. गावच्या सरपंच सुमित्रा देवी आणि महेंद्र मुंडा यांनी याबाबतची दिली.

  डॉ. जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, अपघातानंतर दुलारचंद मुंडा यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची हालचाल मंदावली होती. पण लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बदल झाले आहेत. त्यांना शरीराची हालचाल करता येत आहे. तसेच ते न अडखळता बोलत आहेत. लस घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीत झालेली सुधारणा चकीत करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022