pralay missile

प्रलय हे (Pralay Missile)भारतीय क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर वार करण्यासाठी उपयुक्त असं कमी अंतराचं बॅलिस्टिक मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स प्रोग्रामअंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या एक्सोएटमॉस्फेरिक इंटरसेप्टर मिसाइल पृथ्वी डिफेन्स व्हेईकल आणि प्रहार टेक्टिकल मिसाइलसाठी विकसित टेक्नोलॉजीचं एकत्रित स्वरुप आहे.

  काहिरा: इजिप्त (Egypt) भारताचं प्रलय क्षेपणास्त्र (Pralay Missile Egypt) घेण्यास उत्सुक आहे. याविषयी त्यांच्या सैन्य उत्पादन मंत्रालयाने भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनसोबत(डीआरडीओ) (DRDO) बोलणी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. इजिप्तच्या ट्रान्सफर ऑफ टेक्नोलॉजीअंतर्गत या क्षेपणास्त्राची (मिसाइल) खरेदी केली जाणार आहे. प्रलय हे भारतीय क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर वार करण्यासाठी उपयुक्त असं कमी अंतराचं बॅलिस्टिक मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स प्रोग्रामअंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या एक्सोएटमॉस्फेरिक इंटरसेप्टर मिसाइल पृथ्वी डिफेन्स व्हेईकल आणि प्रहार टेक्टिकल मिसाइलसाठी विकसित टेक्नोलॉजीचं एकत्रित स्वरुप आहे.

  तांत्रिक रिपोर्टमधील दावा
  एका डिफेन्स वेबसाइटने दावा केला आहे की, इजिप्तच्या सैन्य उत्पादन मंत्रालयाने डीआरडीओसोबत या क्षेपणास्त्राची निर्मितीविषयी चर्चा केली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की,इजिप्तने प्रलय मिसाइलची टेक्नोलॉजी ट्रान्सफर करण्याचीही मागणी केली आहे. ते या मिसाइलचे उत्पादन करण्याचीही परवानगी मागत आहेत. मात्र भारताने या डिलविषयी काहीही माहिती दिलेली नाही.

  भारत आणि इजिप्त या देशांमध्ये 2022 मध्ये संरक्षणविषयक सामंजस्य करार झाला होता.या करारावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इजिप्तचे जनरल मोहम्मद जकी यांंनी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक संबंध सुधारले. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले. आगामी काळात दोन्ही देशांमध्ये आणखी सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.

  रेंज
  ‘प्रलय’ हे 350 ते 500 किलोमीटर इतका कमी पल्ला (रेंज) असलेले जमिनीवरून जमिनीवर डागले जाणारे क्षेपणास्त्र असून,500 ते 1 हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. डीआरडीओने विकसित केलेले घन इंधनावर चालणारे हे क्षेपणास्त्र भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमातील पृथ्वी संरक्षण वाहनावर स्थित आहे. कमी पल्ल्याच्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या दिग्दर्शित आंतरखंडीय क्षेपणास्त्राची (गायडेड बॅलिस्टिक मिसाईल) भारताने 2021 मध्ये ओडिशातील बालासोर किनाऱ्यावरून यशस्वी चाचणी केल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) सूत्रांनी सांगितले. हे मिसाइल टर्मिनल फेजमध्ये मॅक 1 पासून मॅक 1.6 इतका वेग असलेले आहे.