कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, २२ जानेवारीनंतरही रॅली, सभा आणि रोड शोवर बंदी कायम

निवडणूक आयोगाने (Election Commission) १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर बंदी घातली आहे. मात्र सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने ही बंदीची मुदत २२ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. (Election Commission Bans Poll Rallies And Roadshows In Poll-Bound States Till 22nd January)

    नवी दिल्ली : कोरोना महामारी (Corona) आणि ओमायक्रॉन (Omicron) संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने (Election Commission) केली आहे. याआधी निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर बंदी घातली आहे. मात्र सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने ही बंदीची मुदत २२ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. (Election Commission Bans Poll Rallies And Roadshows In Poll-Bound States Till 22nd January) नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

    कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. याअगोदर १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे देखील म्हटले होते. त्यामुळे सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आयोगाकडून आज रॅली, सभा आणि रोड शोवरील बंदीची तारीख २२ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

    निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक पक्षांची चिंता वाढली आहे. सगळ्या मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे असा प्रश्न अनेक पक्षांना पडला आहे.