इलॅान मस्क आता मानवामध्ये ब्रेन चिप इम्लांट करणार, मेंदूनं नियंत्रीत होणार संगणक आणि मोबाइल, अंधांनाही दिसणार

यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडून प्रथम-मानवी क्लिनिकल अभ्यासासाठी मान्यता प्राप्त करणे हे त्याच्या तंत्रज्ञानासाठी "एक महत्त्वाची पहिली पायरी" आहे. असं न्यूरालिंकनं म्हण्टलयं.

    ट्विटरमध्ये (twitter) नेहमी काही ना काही बदल करण्यावरुन इलॅान मस्क (elon musk) सतत चर्चेत राहतात. आता पुन्हा त्यांच नाव चर्चेत आलं आहे मात्र, ट्विटरमध्ये नव्याने बदल केले म्हणून नाही. तर, इलॅान मस्क आता मानवामध्ये ब्रेन चिप इम्लांट करणार आहे या वृत्तावरुन. ऐकायला जरी अजब वाटत असलं तरी हे खरं आहे. इलॅान मस्क यांची ब्रेन-चिप कंपनी न्यूरालिंकला (Neuralink ) ब्रेन चिपच्या मानवी चाचण्यासाठी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) कडून मंजुरी मिळाली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास अंध व्यक्तींनाही चिपद्वारे पाहता येणार आहे. तर, पक्षाघाताने ग्रस्त रुग्ण विचार करू शकतील आणि मोबाईल आणि संगणक चालवू शकतील.

    न्यूरालिंकची माहिती

    इलॉन मस्कच्या ब्रेन-चिप कंपनी न्यूरालिंकने ट्विटर पोस्टच्या माध्यमातुन माहिती दिली की, “आम्ही हे सांगण्यास उत्सुक आहोत की आमचा पहिला मानवी क्लिनिकल अभ्यास सुरू करण्यासाठी आम्हाला FDA ची मंजुरी मिळाली आहे. FDA च्या जवळच्या सहकार्याने Neuralink टीमच्या अविश्वसनीय कार्याचा हा परिणाम आहे. एक दिवस आमचे तंत्रज्ञान अनेकांना मदत करेल. न्यूरालिंकचे उद्दिष्ट मानवी मेंदूला थेट संगणकाशी जोडणे आहे. मात्र, याच्या क्लिनिकल चाचणीसाठी भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. इलॉन मस्क यांनी डिसेंबरमध्ये एका सादरीकरणादरम्यान सांगितले की होते की, न्यूरालिंक इम्प्लांटचा उद्देश मानवी मेंदूला संगणकाशी थेट संवाद साधण्यास सक्षम करणे आहे.

    मानवांमध्ये इम्लांट होणार ब्रेन चिप

    मस्क म्हणाले, ‘आम्ही आमच्या पहिल्या मानवासाठी (इम्प्लांट) तयार होण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. साहजिकच आम्ही मानवांमध्ये कोणतेही उपकरण इम्लांट करण्यापूर्वी  खूप सावधगीरी बाळगू.

    न्यूरोलॉजिकल रोग बरे होण्याची अपेक्षा

    जुलै 2019 मध्ये, त्याने वचन दिले की न्यूरालिंक 2020 मध्ये मानवांवर त्याच्या पहिल्या चाचण्या घेण्यास सक्षम असेल. उत्पादनाचे प्रोटोटाइप एका नाण्याच्या आकाराचे माकडांच्या कवटीत रोपण केले गेले आहेत. सादरीकरणादरम्यान, कंपनीने न्यूरालिंक इम्प्लांटद्वारे अनेक माकडांना काही मूलभूत व्हिडिओ गेम ‘खेळताना’ किंवा स्क्रीनवर कर्सर हलवताना दाखवले. अशा क्षमता गमावलेल्या मानवांमध्ये गतिशीलता परत मिळवण्यासाठी कंपनी इम्प्लांट वापरण्याचा प्रयत्न करेल असे मस्क यांनी सांगितले.