एलन मस्क भारतात अभियंता भरती करणार, ट्विटरचे विकेंद्रीकरण करण्याची योजना

याबाबत बैठकीत एलन मस्क यांनी दावा केला आहे की, ट्विटरचे टेक्नॉलॉजी स्टॅक सुरूवातीपासूनच तयार करणे आवश्यक आहे. काही प्रमाणात ट्विटरचे विकेंद्रीकरण करणे ही चांगली कल्पना आहे.

    नवी दिल्ली – एलन मस्क आता ट्विटरमध्ये नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. कर्मचार्‍यांशी झालेल्या बैठकीदरम्यान, मस्क यांनी अभियांत्रिकी आणि विक्री विभागात नवीन कर्मचारी नियुक्तीची योजना जाहीर केली आहे. द व्हर्जने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ट्विटरचे सीईओ एलन मस्क जपान, भारत, इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये अभियंता टीम स्थापन करून ट्विटर कंपनीचे विकेंद्रीकरण करणार आहेत.

    याबाबत बैठकीत एलन मस्क यांनी दावा केला आहे की, ट्विटरचे टेक्नॉलॉजी स्टॅक सुरूवातीपासूनच तयार करणे आवश्यक आहे. काही प्रमाणात ट्विटरचे विकेंद्रीकरण करणे ही चांगली कल्पना आहे. मात्र, मस्क कोणत्या प्रकारच्या अभियंताची आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह घेण्याचा विचार करत आहेत, हे अद्याप कळू शकले नाही. तथापि, यापूर्वी त्यांनी सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या गरजेवर भर दिला होता. त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले होते.

    जे कर्मचारी अजूनही ट्विटरवर आहेत त्यांच्या फायद्यांबाबतही मस्क यांनी बैठकीत सांगितले.दावा केला की त्याला स्टॉक ऑप्शन्स (शेअर्स) मध्ये पैसे दिले जातील. वेळोवेळी त्याला ते स्टॉक विकण्याची संधी मिळेल. मस्कची दुसरी कंपनी SpaceX देखील असेच स्टॉक पर्याय ऑफर करते. यात मस्क यांनी ट्विटरच्या जपानमधील कामगिरीचे कौतुक केले. ट्विटर हे अमेरिकाकेंद्रित नसून जपान केंद्रित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.