Will the treatment on corona include red ant chutney? High Court orders inquiry into AYUSH ministry

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लाल मुंग्यांची चटणी उपचार म्हणून वापरण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ओडिशातील अभियंता आणि संशोधक नायधर पाढियाल यांनी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी धुडकावून लावली होती. त्यामुळे लाल मुंग्यांची चटणी देशभरातील लोकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. परंतु आता लाल मुंग्यांची चटणीच नाही तर चटणी विकणाराही फेमस झाला आहे(Employed by selling red ant chutney; Earned millions even in lockdown).

  दिल्ली : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लाल मुंग्यांची चटणी उपचार म्हणून वापरण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ओडिशातील अभियंता आणि संशोधक नायधर पाढियाल यांनी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी धुडकावून लावली होती. त्यामुळे लाल मुंग्यांची चटणी देशभरातील लोकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. परंतु आता लाल मुंग्यांची चटणीच नाही तर चटणी विकणाराही फेमस झाला आहे(Employed by selling red ant chutney; Earned millions even in lockdown).

  छत्तीसगडच्या बस्तरमध्ये बनवली जाणारी लाल मुंग्यांची चटणी जगप्रसिद्ध आहे. बस्तरमधील आदिवासी समाजातील लोकांच्या रोजच्या जेवणात लाल मुंग्यांच्या चटणीचा समावेश असतो. परंतु हीच लाल मुंग्यांची चटणी एका तरुणाचे रोजगाराचे साधन ठरले आहे. जगदलपूर-बिजापूर राष्ट्रीय महामार्ग 63 वर असणाऱ्या एका धाब्यावर ही चटणी मिळते.

  देशभरात ओळख बनली

  जगदलपूरपासून 55 किलोमीटर दूर तिरतूम येथे ‘आमचो बस्तर’ नावाचा एक धाबा आहे. राजेश यालम हा आदिवासी तरुण या धाब्याचा मालक असून त्याचे वय अवघे 23 वर्षांचे आहे. एवढ्या कमी वयातली बस्तरच नाही तर छत्तीसगडसह देशभरात त्याची ओळख बनली आहे. लाल मुंग्यांची चटणी आणि बस्तरमधील आदिवासी समाजाच्या खास व्यंजनामुळे त्याला ही ओळख मिलाली आहे. ‘आमचो बस्तर’ या धाब्यावर विश्वप्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी, बांबू चिकन, तांदळापासून बनवलेली दारू यासह अन्य आदिवासी पद्धतीने बनवलेले पदार्थ मिळतात.

  देश-विदेशातून लोक येतात

  राजेशने सांगितले की, देश-विदेशातून लोक या धाब्याला भेट देण्यासाठी येतात. केंद्रीय मंत्री रेणुका सिंह आणि अर्जुन मुंडा यांनीही एका कार्यक्रमात राजेश यालम याने बनवलेल्या लाल मुंग्यांच्या चटणीचा आणि मोहापासून बनवलेल्या दारुचा आस्वाद घेतला होता. बस्तरमधील पारंपरिक व्यंजनांचा प्रचार करण्यासाठी मी देशभरात फिरतो. ज्या कोणत्या भागात यात्रा किंवा पारंपरिक व्यंजनांचे स्टॉल लागतात तिथे मी स्टॉल लावतो. लोक आवडीने आमचे पदार्थ खातात. आदिवासी पदार्थांसह त्याच्या धाब्यावर चायनिज पदार्थही मिळतात. या धाब्याद्वारे राजेश महिन्याला दोन ते तीन लाखांची कमाईही करतो.

  हे सुद्धा वाचा
  • 2022