जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांसोबत चकमक ; लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत गुरुवारी लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) एक दहशतवादी मारला गेला. संरक्षण प्रवक्त्याने ही माहिती दिली.बुधवारी झालेल्या चकमकीत स्पेशल फोर्सच्या दोन कॅप्टनसह लष्कराचे चार जवान शहीद झाले तर दोन जण जखमी झाले.

    राजौरी : जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत गुरुवारी लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) एक दहशतवादी मारला गेला. संरक्षण प्रवक्त्याने ही माहिती दिली.बुधवारी झालेल्या चकमकीत स्पेशल फोर्सच्या दोन कॅप्टनसह लष्कराचे चार जवान शहीद झाले तर दोन जण जखमी झाले.
    धरमसालच्या बाजीमल भागात रात्रभर थांबल्यानंतर आज सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. ते म्हणाले की, अतिरेकी घनदाट जंगलाच्या भागाकडे पळून जाऊ नयेत यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांच्या मदतीने या भागाला रात्रभर घेराव घालण्यात आला.या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेल्याचे प्रवक्त्याने सांगितले. त्याची ओळख क्वारी नावाचा कट्टर दहशतवादी म्हणून झाली आहे,त्याला पाकिस्तानमध्ये आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले होते असे त्यांनी सांगितले.
    ते म्हणाले की, पाकिस्तानी दहशतवादी राजौरी-पुंछ भागात गेल्या एक वर्षापासून त्याच्या गटासह सक्रिय होता. ठार झालेला दहशतवादी हा डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जात असल्याचे त्यांनी सांगितले.प्रवक्त्याने सांगितले की, क्वारीला या भागातील दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठवण्यात आले होते आणि तो ‘इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हायसेस’ (आयईडी) बनवण्यात तज्ञ होता.या वर्षी जानेवारी महिन्यात डांगरी येथे झालेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले होते.