महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत; देशात फक्त भाजपच राहील; भाजपाध्यक्षांचा दावा

काँग्रेस आता देशातील अनेक राज्यांतूनही संपुष्टात येत असून, भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष हा एक कौटुंबिक पक्ष आहे, बिहारमध्ये आम्ही कौटुंबिक पक्ष असलेल्या 'राजद'शी लढत आहोत. नवीन बाबूंचा पक्ष हा ओडिशातील वन मॅन पार्टी असून, महाराष्ट्रात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनाही एक कौटुंबिक पक्ष असल्याचे ते म्हणाले.

    पाटणा : भाजपशी (BJP) मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात (National Party) नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shivsena End) अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांनी केला आहे. कोणताही राष्ट्रीय पक्ष भाजपला पराभूत करू शकेल अशा स्थितीत राहील, असेही नड्डा यांनी म्हटले आहे. बिहार (Bihar) येथील १६ जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते.

    नड्डा म्हणाले की, काँग्रेस (Congress) आता देशातील अनेक राज्यांतूनही संपुष्टात येत असून, भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस (Power House Of Activist) आहे. उत्तर प्रदेशमध्ये (UP) समाजवादी पक्ष (Samajwadi Party) हा एक कौटुंबिक पक्ष आहे, बिहारमध्ये आम्ही कौटुंबिक पक्ष असलेल्या ‘राजद’शी (RJD) लढत आहोत. नवीन बाबूंचा पक्ष हा ओडिशातील वन मॅन पार्टी असून, महाराष्ट्रात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनाही एक कौटुंबिक पक्ष असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस हा भाऊ-बहिणींचा पक्ष झाला असून, लढा बांधिलकीतून असतो, बांधिलकीतून ताकद जन्माला येते. भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेला पक्ष आहे.

    भाजपच्या वाढत्या स्वीकारार्हतेचा दावा करून ते म्हणाले की, आता देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना मूल्य शिकवते असेही ते म्हणाले. आम्ही वैचारिक पार्श्वभूमी घेऊन उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.