Corona's havoc in the district! On the same day, 83 new patients, the number of active patients reached half a dozen

कोरोना व्हायरसचा XBB15 चा एक नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हायरच्या व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे.

    कोरोना व्हायरसचा XBB15 चा एक नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हायरच्या व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे. चीनी वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ एरिक फीगेल डिंग यांचे म्हणणे आहे की, हा व्हेरिएंट पूर्वीच्या BQ1 प्रकारापेक्षा 120 पट वेगाने संसर्ग पसरवतो. पूर्वीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात तो अधिक पटाईत आहे.

    XBB15 हा व्हेरिएंट हा कोरोनाचा सुपर प्रकार असल्याने डिंग यांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आरोग्यतज्ज्ञ डिंग यांनी म्हटले की, येथील एका शास्त्रज्ञाने न्यूयॉर्कमध्ये पसरलेल्या या व्हेरिएंटचा अभ्यास केला आहे. त्यांनी सलग 17 ट्विट करित आरोप केला की, चीनप्रमाणे अमेरिकाही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा डेटा लपवत आहे. तर या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आता भारतातील गुजरातमध्येही आढळून आला आहे.

    अभ्यासात नवीन प्रकारातील तीन खास गोष्टी समोर आल्या

    XBB15 हे कोरोनाचे ‘सुपर व्हेरिएंट’ आहे. XBB15 17 दिवसात जितक्या लोकांना संक्रमित करत आहे तितका BQ1 26 दिवसात संक्रमित होत आहे.
    त्याचे R मूल्य म्हणजेच पुनरुत्पादन मूल्य BQ1 पेक्षा जास्त आहे.

    आर व्हॅल्यू हे दाखवते की, कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीकडून किती लोकांना संसर्ग होत आहे किंवा होऊ शकतो.

    XBB15 ख्रिसमसच्या आधी BQ1 पेक्षा 108% वेगाने पसरत होता. ख्रिसमसनंतर हा वेग वाढून 120% झाला आहे.

    न्यूयॉर्कसह अनेक US शहरांमध्ये XBB.1.5 वेगाने पसरतय

    अनेक यूएस शहरांमध्ये, XBB.1.5 प्रकाराने इतर प्रकारांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. न्यू इंग्लंड, यूएसए, कनेक्टिकट शहरातही त्याच्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. तेथेही यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.