epfo

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) (CBT) बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत.

नवी दिल्ली :कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ (EPFO Interest Rate) केली आहे. या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने आपल्या सहा कोटी खातेदारांना भेट दिली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता पीएफ खातेदाराला 8.15 टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये 2021-22 साठी PF वरील व्याज 8.1% या नीचांकी पातळीवर घसरला होता. ईपीएफओ अनेक ठिकाणी पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.

नोकरदारांना फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) (CBT) बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत. EPF व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे 6 कोटी सक्रिय ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. यापैकी 72.73 लाख हे आर्थिक वर्ष 2022 मध्ये पेन्शनधारक होते.

40 वर्षातील सर्वात कमी व्याजदर
गेल्या वर्षी मार्च महिन्यात सरकारने पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर 8.5% वरून 8.1 टक्क्यांवर आणला, जो जवळपास 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर राहिला. 1977-78 मध्ये ईपीएफओने 8% व्याजदर निश्चित केला होता, मात्र तेव्हापासून व्याजदर सतत 8.25% किंवा त्याहून अधिक राहिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के व्याज मिळत होते.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून 12% कपात केलेली रक्कम ईपीएफ खात्यात कम केली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी 8.33% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर 3.67% EPF मध्ये जमा केली जाते. सध्याच्या काळात देशभरात सुमारे 6.5 कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.

ईपीएफओच्या कमाईत वाढ
ईपीएफओकडून यंदा व्याज दरवाढ अपेक्षित होती. कमाईच्या बाबतीत कर्मचारी संघटनेसाठी मागील वर्ष खूप चांगले होते. ईपीएफओचे उत्पन्न वाढले आहे. EPFO तुमचा निधी अनेक ठिकाणी गुंतवते जिथून त्याला परतावा मिळतो. आणि याच गुंतवणुकीद्वारे संघटनेच्या सदस्यांना जमा पीएफवर व्याज मिळते. यावेळी व्याजदर वाढवण्यामागे अनेक कारणे दिली जात होती. यावेळी 8.29% पर्यंत व्याजदर वाढण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली होती.