
पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. येथे एका मुस्लीम व्यक्तीने आपल्या माजी (हिंदू) सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला(Examples of Hindu-Muslim unity; A Muslim man donated a kidney to a Hindu friend).
दिल्ली : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. येथे एका मुस्लीम व्यक्तीने आपल्या माजी (हिंदू) सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला(Examples of Hindu-Muslim unity; A Muslim man donated a kidney to a Hindu friend).
नुकतेच हसलू मोहम्मद नावाच्या या व्यक्तीने राज्याच्या आरोग्य विभागाकडे अर्ज करून अवयवदानाच्या मान्यतेसाठी अर्ज केला. तेव्हा नियमानुसार, आरोग्य विभागाने त्याची किडनी बेकायदेशीरपणे पैसे घेऊन विकली जात नाही ना, याचा तपास करण्यास स्थानिक पोलिसांना सांगितले.
पोलीस तपासात कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे सांगितले जात आहे.
याबाबतचा अहवाल लवकरच आरोग्य विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. माहितीनुसार, हसलू मोहम्मद आणि अचिंत्य बिस्वास यांची सहा वर्षांपूर्वी मैत्री झाली, जेव्हा ते एका छोट्या फायनान्स कंपनीत एजंट म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी हसलू यांनी नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. कालांतराने दोघेही घट्ट मित्र बनले.
आमचा धर्म वेगळा पण रक्तगट एकच
जेव्हा हसलूला कळाले की त्याचा सर्वात चांगला मित्र संकटात आहे, तेव्हा तो त्याच्या मदतीसाठी पुढे आला. हसलू सांगतात, की “जेव्हा मी ऐकले की अचिंत्याला तातडीने प्रत्यारोपणाची गरज आहे, तेव्हा मी माझी एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. असे केल्याने मी मरणार नाही, पण अचिंत्याला नवीन जीवन मिळेल.” धार्मिक सन्मानाबद्दल विचारले असता हसलू म्हणाले की ‘मानवी जीवन सर्वात मौल्यवान आहे. आमचा धर्म वेगळा असू शकतो पण आमचा रक्तगट एकच आहे. त्याचवेळी हसलू यांच्या पत्नी मनोरा यांनी सांगितले की, ‘एखाद्या व्यक्तीने जे केले पाहिजे ते त्यांच्या पतीने केले. त्यांना 5 आणि 7 वर्षांची दोन मुले आहेत.