अहमदाबादमध्ये गॅस सिलिंडरच्या गोदामात स्फोट, ७ गाड्या घटनास्थळी दाखल

या घटनेच नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी ही आग आकस्मिक कारणाने लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.

    अहमदाबाद : अहमदाबाद शहरातील निकोल भागातील काठवारा रोडवरील गॅस सिलिंडरच्या गोदामात भीषण आग लागल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

    स्फोटानंतर एकापाठोपाठ एक गोदामात ठेवलेले गॅस सिलिंडर फुटू लागले. यामुळे संपूर्ण गोडामाला आग लागली. यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोक हादरले. या घटनेच नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी ही आग आकस्मिक कारणाने लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या पोलीस आणि अग्निशमन विभाग या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.