फारूक अब्दुल्ला यांनी शंकराचार्यांशी केली राहुल गांधींची तुलना, म्हणाले…

फारुख अब्दुल्ला म्हणाले, "शतकापूर्वी शंकराचार्य येथे आले होते. जेव्हा रस्ते नव्हते, तर जंगले होते. तेव्हा ते चालत होते. ते कन्याकुमारीहून पायी काश्मीरला गेले होते. राहुल गांधी हे दुसरे व्यक्ती आहेत, ज्यांनी कन्याकुमारीतून प्रवास केला आणि काश्मीरमध्ये पोहचत आहेत.

    नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी राहुल गांधींची तुलना आदि शंकराचार्य यांच्याशी केली आहे. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी यात्रा काढणारे शंकराचार्यांनंतर ते दुसरे व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. हा ‘राम’ आणि ‘गांधी’चा देश असल्याचेही अब्दुल्ला म्हणाले. भारत जोडो यात्रेने गुरुवारी संध्याकाळी जम्मूमध्ये प्रवेश केला असून आजचा दुसरा दिवस आहे.

    फारुख अब्दुल्ला म्हणाले, “शतकापूर्वी शंकराचार्य येथे आले होते. जेव्हा रस्ते नव्हते, तर जंगले होते. तेव्हा ते चालत होते. ते कन्याकुमारीहून पायी काश्मीरला गेले होते. राहुल गांधी हे दुसरे व्यक्ती आहेत, ज्यांनी कन्याकुमारीतून प्रवास केला आणि काश्मीरमध्ये पोहचत आहेत.

    फारुख अब्दुल्ला यांनीही पाकिस्तान आणि दहशतवादावर वक्तव्य केले. ते म्हणाले की, जोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा होत नाही. तोपर्यंत हा मुद्दा कायम राहणार आहे. दहशतवाद जिवंत आहे आणि जोपर्यंत तुम्ही पाकिस्तानशी बोलणार नाही. तोपर्यंत तो संपणार नाही, हे मी माझ्या रक्ताने तुम्हाला लेखी स्वरूपात देतो, असेही अब्दुल्ला म्हणाले.