लक्षद्वीपला १००० दिवसांत जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, सरकार देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. देशातील १,३०० हून अधिक बेटांच्या विकासासाठी पावले उचलली जात आहेत. गेल्या आठवड्यात अंदमान आणि निकोबार बेटे ऑप्टिकल फायबर केबलने जोडले गेले आहेत.

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी(१५ ऑगस्ट) देशातील सर्व छोट्या बेटांमधील विकासकामांना गती देण्यावर भर दिला आहे. ते म्हणाले की, येत्या तीन वर्षांत लक्षद्वीपला जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल देखील जोडले जातील. ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, सरकार देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. देशातील १,३०० हून अधिक बेटांच्या विकासासाठी पावले उचलली जात आहेत. गेल्या आठवड्यात अंदमान आणि निकोबार बेटे ऑप्टिकल फायबर केबलने जोडले गेले आहेत. “आता चेन्नई आणि दिल्ली सारख्या इंटरनेट सेवा देखील अंदमान आणि निकोबारला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.”

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, लक्षद्वीपला येत्या १,००० दिवसांत वेगवान इंटरनेट सुविधेसह जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अगदी येत्या काळात ह्या बेटावर इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. कोरोना विषाणूच्या आव्हानांच्या दरम्यान देशाला स्वावलंबी बनविण्याचा आपला निर्धार व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “लडाख ते अरुणाचल प्रदेश पर्यंत नवीन रस्ते तयार करण्यात आले आहेत, ते हिमालयातील शिखर असो वा हिंद महासागर. देशात १,3०० हून अधिक बेटे आहेत, त्यापैकी काही विकासात आपण पुढे आहोत. अंदमान निकोबारला चेन्नई, दिल्ली सारखी इंटरनेट सुविधा देखील देण्यात आली आहे आणि लक्षद्वीपला १०,००० दिवसांत वेगवान इंटरनेटशी जोडण्याचे लक्ष्य आहे.