काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर धुमश्चक्री; अनंतनागमध्ये लष्कराचे दोन अधिकार शहीद

    नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. आज दिवसभरदेखील लष्कराच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर कोंबिग ऑपरेशन राबवले. या कारवाईत एक जवान शहीद तर काही दहशतवादीदेखील ठार झाले होते. पण आताच्या ताज्या घटनेत दोन लष्कराचे अधिकारी शहीद झाल्याचे वृत्त आहे.
    एएनआयच्या वृत्तानुसार, काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी चांगलीच धुमश्चक्री झाली आहे.

    राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीची जोरदार फायरिंग

    दहशतवाद्यांसोबत राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीची जोरदार फायरिंग झाली. यामध्ये 19 RR या युनिटचं नेतृत्व करणाऱ्या एका कर्नल आणि मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.