fraud

लखनौ :  उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल यांच्या भावाविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात मोबाईलच्या जाहिरातीसाठी फलक लावण्यात आले होते. यातील काही होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे होती.

लखनौ :  उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल यांच्या भावाविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात मोबाईलच्या जाहिरातीसाठी फलक लावण्यात आले होते. यातील काही होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे होती. होर्डिंग्जमधील स्वदेशी मोबाइलच्या दाव्यासह आत्मनिर्भर भारत घोषणेचाही उल्लेख होता. मोदी आणि योगी यांच्याबरोबर काही होर्डिंग्जवर मंत्री आणि आमदारांचे फोटोही होते. त्यानंतर सरकारद्वारे या मोबाईलच्या प्रचाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी लखनौमध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

लॉन्चिंग कार्यक्रमात आमदारांचीही उपस्थिती
कथित स्वदेशी मोबाइल लॉन्च करणाऱ्या कंपनीचे नाव फेसचेन असे आहे. त्याचबरोबर माध्यमांच्या वृत्तानुसार या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तर प्रदेशचे मंत्री कपिलदेव अग्रवाल यांचे बंधू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने लखनौच्या ताज हॉटेलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात मंत्री कपिलदेव अग्रवाल यांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आमदार नीलिमा कटियार, नीरज वोरा आणि देवमणी द्विवेदीही सहभागी होते अशी चर्चा आहे.

वर्षभरापूर्वी स्थापन केली होती कंपनी
दरम्यान, तपासात मुख्य दोषी कोण आहेत, याचा शोध सुरू असून त्यात कोण सामील आहे आणि याचा कोणाला फायदा होणार आहे या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस सध्या तपास करत आहेत. दरम्यान, जी माहिती समोर आली त्यानुसार ही कंपनी १ मे २०१९ रोजी स्थापन झाली होती आणि कंपनीच्या सीईओचे नाव दुर्गा प्रसाद त्रिपाठी असल्याचे समजते.