पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे की, याचा परिणाम प्रॉव्हिडेंट फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या केवळ १टक्के लोकांवर होणार आहे. पीएफमध्ये उर्वरित लोकांचे योगदान अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचेही त्यांनी म्हटले.

    नवी दिल्ली : प्रॉव्हिडेंट फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर केंद्र सरकारने कर सवलत मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत केंद्र सरकारने वाढविली आहे. दरम्यान, अशा कर्मचाऱ्यांना ही सवलत मिळणार आहे, पीएफमध्ये ज्यांच्या कंपनीकडून योगदान दिले जात नाही.

    अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे की, याचा परिणाम प्रॉव्हिडेंट फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या केवळ १टक्के लोकांवर होणार आहे. पीएफमध्ये उर्वरित लोकांचे योगदान अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचेही त्यांनी म्हटले.

    अर्थसंकल्पात केंद्र सरकारने घोषणा केली होती की, जर तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत असेल, तर तुम्हाला अतिरिक्त गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स द्यावा लागेल, कारण त्यात नियोक्ता देखील त्याच्याकडून योगदान देतो. दरम्यान तुम्ही निश्चित १२ टक्क्यांच्या अतिरिक्त अतिरिक्‍त वॉलिंटरी प्रॉव्हिडेंट फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर देखील सूट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.