५ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” ही मोहिम साजरी होत असताना, आता 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी मोफत करण्यासाठी घोषणा केली आहे. म्हणजे या कालावधीत तुम्हाला स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

    नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य होऊन 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने “हर घर तिरंगा” ही मोहिम केंद्र सरकारकडून राबविली जात आहे. याच पाश्रर्वभूमीवर केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पर्वात आता केंद्र सरकारने लोकांना या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात जोडण्यासाठी आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी तसेच देशप्रेम, स्वातंत्र्यसंग्राम पुन्हा जागृत करण्यासाठी केंद्राने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत.

    दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” ही मोहिम साजरी होत असताना, आता 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी मोफत करण्यासाठी घोषणा केली आहे. म्हणजे या कालावधीत तुम्हाला स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. हा निर्णय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागाने घेतला आहे. तसेच एएसआयच्या मेमोरियल-2 चे संचालक डॉ. एन.के. पाठक यांच्यावतीने बुधवारी आदेश जारी करण्यात आला आहे.