Ban on all flights from Britain to India till December 31

गेल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयानुसार युकेला जाणारी विमानसेवा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्थगित करण्यात आली होती. आता ही स्थगिती वाढवण्यात आली असून ७ जानेवारी २०२१ पर्यंत ही विमानसेवा स्थगित कऱण्याची घोषणा करण्यात आलीय. विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही घोषणा केलीय.

कोरोना व्हायरसचा नवा स्टिंट आढळल्याने युनायटेड किंगडमला जाणारी आणि येणारी विमानसेवा स्थगिती करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं घेतला होता. मात्र त्यानंतर युकेतून भारतात आलेल्या सहा रुग्णांना कोरोनाच्या नव्या स्टिंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर युकेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांच्या प्रवासावरील स्थगिती एका आठवड्यानं वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

गेल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयानुसार युकेला जाणारी विमानसेवा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्थगित करण्यात आली होती. आता ही स्थगिती वाढवण्यात आली असून ७ जानेवारी २०२१ पर्यंत ही विमानसेवा स्थगित कऱण्याची घोषणा करण्यात आलीय. विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही घोषणा केलीय.


इंग्लंडमधून भारतात आलेल्या ६ जणांच्या चाचणीत कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेला विषाणू आढळून आलाय. त्यानंतर या सहा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्या त्या राज्यातील सरकारांना याची सूचना देण्यात आली असून सर्व खबरदारीचे उपाय राबवले जात असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्यानं सांगितलंय. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिलीय.

या रुग्णांसोबत प्रवास केलेले, त्यांच्या संपर्कात आलेले आणि त्यांच्या कुटंबातील व्यक्तींना शोधून त्यांच्यादेखील चाचण्या करण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेऊन असून आवश्यक सूचना वेळोवेळी राज्य सरकारपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचं सांगण्यात येतंय.

आरोग्य खात्याच्या माहितीनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत एकूण ३३ हजार प्रवासी युरोपातून भारतात आले आहेत. या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जात असून त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. यापैकी आतापर्यंत ११४ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. २३ डिसेंबरपासून युरोपातून येणाऱ्या विमानांना तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. आता ७ जानेवारी २०२१ पर्यंत ही सेवा स्थगित असणार आहे.