ईशान्येकडील राज्यांवर आस्मानी संकट; मृतांचा आकडा वाढला

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी मेघालयात सामान्यापेक्षा १७२ टक्के जास्त पाऊस झाला. आसाममध्ये १०० टक्के जास्त आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये आणखी ११ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

    दिल्ली : अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. ईशान्येकडील (North East) राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झाल्याने अनेक गावांत पूरपरिस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. यामध्ये भूस्खलनाच्या (Landslide) घटना घडल्या असून तब्बल १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून या आस्मानी संकटाचा सामना आसाम (Assam), मेघालय (Meghalaya) आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) ही राज्य करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने सर्व राज्यांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

    आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात ११ मृत्यूची नोंद झाली, त्यापैकी आठ मृत्यू ३२ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. तर इतर पाच जिल्ह्यांत दोन मुलांसह लोक बेपत्ता आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आसाम आणि मेघालयातील पूरग्रस्त भागात पाठवले जाईल. केंद्र या भागातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले.