निवडणुकीत पैशांचा पूर! आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरावर आयकर विभागाचा छापा; तब्बल एक कोटी रुपये जप्त

५०० रुपयांच्या या सर्व नोटा होत्या. आयटी अधिकाऱ्यांना टिप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हा छापा मारून ही रक्कम जप्त केली आहे. टिप मिळाल्यानंतर आयटी विभागाने आमदाराच्या घरावर छापा मारला. रविवारी सकाळी हा छापा मारून दिवसभर सर्च ऑपरेशन करण्यात आलं.

    चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने अण्णाद्रमुकचे आमदार आर. चंद्रशेखर यांचा ड्रायव्हर अलगरासामी याच्या घरावर छापा मारला. या छाप्यात आयकर विभागाने एक-दोन लाख रुपये नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ५०० रुपयांच्या या सर्व नोटा होत्या. आयटी अधिकाऱ्यांना टिप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हा छापा मारून ही रक्कम जप्त केली आहे. टिप मिळाल्यानंतर आयटी विभागाने आमदाराच्या घरावर छापा मारला. रविवारी सकाळी हा छापा मारून दिवसभर सर्च ऑपरेशन करण्यात आलं.

    तीन कोटी जप्त

    चेकींग करताना पैशाचं घबाड सापडल्यानंतर कारमधील लोकांना हा पैसा कुठून आला असं विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी आम्हाला माहीत नसल्याचं सांगितलं. तर गेल्याच आठवड्यात श्रीविल्लीपुथुर विधानसभा मतदारसंघातही एका वाहनातून ३.२१ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.