Vegan पदार्थांसाठी FSSAI आणला नवीन लोगो, पदार्थ ओळखण्यास ठरणार उपयुक्त

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने(FSSAI) विगन खाद्यपदार्थांसाठी काही नवीन नियम आणले असून विगन पदार्थांसाठी एक नवा लोगो लाँच(FSSAI New Logo For Vegan Food) केला आहे.

    आहारानुसार आपण शाकाहारी(Veg) किंवा मांसाहारी(Non Veg) असं पदार्थांचं वर्गीकरण करत असतो. मात्र या दोन प्रकारांशिवाय विगन(Vegan) हा तिसरा प्रकार आहे. विगन लोक दुग्धजन्य पदार्थ(Milk Products) आणि अंड्यांचं(Eggs) सेवन करत नाहीत. विगन फूड(Vegan Food) पर्यावरणपूरक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या वनस्पतींपासून मॉक मीटसारखे अनेक पर्यायी पदार्थ येत आहेत. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने(FSSAI) विगन खाद्यपदार्थांसाठी काही नवीन नियम आणले असून विगन पदार्थांसाठी एक नवा लोगो लाँच(FSSAI New Logo For Vegan Food) केला आहे.

    हिरव्या ठिपक्यात शाकाहारी पदार्थ आणि लाल ठिपक्यात मांसाहारी पदार्थ दर्शवण्यात येतात. त्याप्रमाणे विगन पदार्थ आता नवीन हिरव्या रंगाच्या लोगोने दाखवले जाणार आहेत.पहिल्यांदाच भारत सरकारने विगन उत्पादनांना वेगळी ओळख दिली आहे. याशिवाय काही नियम आणले असून विगन पदार्थ तयार करताना त्याचं पालन करणं आवश्यक असेल.

    भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानच्या मते(FSSAI), विगन खाद्यपदार्थामध्ये कोणत्याही प्राण्यांच्या घटकांचा वापर केला जात नाही. यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन, मांस, अंडी, मध किंवा रेशीम, रंग किंवा हाडांचा समावेश नसतो. हे पदार्थ पूर्णपणे वनस्पतींपासून बनवले जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून लोकांचा शाकाहारी आणि विगन पदार्थांकडे कल वाढला आहे. त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांप्रमाणेच विगन पदार्थांना महत्व देत त्यासाठी व्ही आकाराचा वेगळा लोगो आणि नियमावली आणली आहे.