काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरुर यांच्यात लढत

सध्या काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो (bharat jodo) ही देशभर यात्रा काढत आहेत. त्यामुळं राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे असं काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना वाटत आहे, पण राहुल गांधी पुन्हा काँग्रेसला गतवैभव मिळवून देतीक का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.

    नवी दिल्ली : देशात मोदी सरकार (Modi government) आल्यापासून म्हणजे २०१४ पासून भाजपाची (BJP) सत्ता आली आहे, तेव्हापासून काँग्रेसला (Congress) घरघर लागली आहे. संपूर्ण देशात काँग्रेसची अनेक राज्यातील सत्ता गेली आहे. वरिष्ठ पातळीवर प्रभावी नेतृत्व नसल्यामुळं अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दरम्यान, सध्या काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो (bharat jodo) ही देशभर यात्रा काढत आहेत. त्यामुळं राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे असं काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना वाटत आहे, पण राहुल गांधी पुन्हा काँग्रेसला गतवैभव मिळवून देतीक का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.

    दरम्यान, अनेक महिन्यापासून काँग्रेसला अध्यक्ष नाहीय. जेव्हा सोनिया गांधींनी राजीनामा दिला आहे, तेव्हापासून काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे, दरम्यान, अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी सुद्धा नकार दिला आहे, त्यामुळं जुने व अनुभवी नेत्यांनी अध्यक्षपदासाठी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात असताना, आता राजस्थाचे अशोक गेहलोत हे अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं गेहलोत विरुद्ध शशी थरुर अशी लढत जवळ निश्चित मानली जात आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसला नवीन अध्यक्ष कोण मिळणार हे येणार काळच ठरवेल.