विदेशी नागरिकांनी बुटाच्या तळव्यामध्ये अन् अंडरवेअरमध्ये लपवले 1.40 कोटींचे सोने, हा VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल

तीन नागरिकांना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे. या लोकांकडून १.४ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

सोने, दागिने किंवा ड्रग्स लपवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. अनेकदा असे अनेक जण विमानतळावरही पकडले जातात. अशा तीन नागरिकांना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे. या लोकांकडून १.४ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

हे परदेशी नागरिक आदिस अबाबाहून मुंबईत आले होते. या लोकांनी अंडरवेअर आणि बुटांच्या तळव्यामध्ये सोने लपवले होते. एकूण सोने 3 किलोपेक्षा जास्त होते आणि त्याची किंमत अंदाजे 1.40 कोटी रुपये आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लोकांना तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. अशाप्रकारे सोने लपवण्याचे कारण काय, याची माहिती या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.