माजी क्रिकेटपटू शिवरामाकृष्णन भाजपात

१९८३ मध्ये पहिला सामना खेळल्यानंतर शिवरामकृष्णनला फारशी संधी मिळाली नव्हती, त्यानंतर १९८७ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर समालोचक म्हणून त्यांनी जगभरात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली.

चेन्नई. माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे भाजपामध्ये सामील झालेल्या शिवने वयाच्या १७ व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९८३ मध्ये पहिला सामना खेळल्यानंतर शिवरामकृष्णनला फारशी संधी मिळाली नव्हती, त्यानंतर १९८७ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर समालोचक म्हणून त्यांनी जगभरात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. भारताकडून ९ कसोटीत २६ बळी घेणाऱ्या शिवाने १६ एकदिवसीय सामन्यात १५ गडी टीपले होते.

खुशबू सुंदर यांनी दिली होती माहिती
तत्पूर्वी, भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवर ट्विट केले होते की, तिचे ‘दोन खास मित्र’ या पार्टीत सामील झाले आहेत. तथापि, त्यावेळी त्यांनी कुणाचेही नाव नमूद केले नव्हते. यावर्षी ऑक्टोबरमध्ये भाजपमध्ये रुजू झालेल्या खुशबू पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. तेथे अपमान झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. उल्लेखनीय असे की एक दिवसाआधीच अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याची घोषणा केली होती.