कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश, केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश

रविवारीच दिल्लीला पोहोचला होते. सोमवारी सकाळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी नड्डा सोबतचा फोटोही फेसबुक पेजवर पोस्ट केला. या भेटीत नड्डा यांनी कॅप्टनला नव्या राजकीय खेळीसाठी शुभेच्छा दिल्या.

    नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संध्याकाळी ६ वाजता भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू देखील उपस्थित होते. अमरिंदर सिंग यांनी त्यांचा ‘पंजाब लोक काँग्रेस’ (PLC) पक्षही भाजपमध्ये विलीन केला आहे.

    रविवारीच दिल्लीला पोहोचला होते. सोमवारी सकाळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी नड्डा सोबतचा फोटोही फेसबुक पेजवर पोस्ट केला. या भेटीत नड्डा यांनी कॅप्टनला नव्या राजकीय खेळीसाठी शुभेच्छा दिल्या.

    यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिंग भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी कॅप्टनचा भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबमध्ये, सुनील जाखर, बलबीर सिद्धू, राजकुमार वेरका, राणा गुरमीत सोधी, फतेह जंगसिंग बाजवा, गुरप्रीत सिंग कांगार, सुंदर शाम अरोरा, केवल ढिल्लन यांसारख्या काँग्रेसमधील कॅप्टनच्या साथीदारांपैकी अनेक नेते आधीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आता कॅप्टन स्वतः भाजपमध्ये जाऊन पंजाबमध्ये पक्ष मजबूत करणार आहेत.

    कॅप्टन सिंग यांनी गतवर्षी काँग्रेसचा हात सोडत आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत पीएलसीची स्थापना केली होती. या पक्षाच्या नावावर त्यांनी पंजाब विधानसभेची निवडणूकही लढविली, मात्र ते स्वत:ही यात पराभूत झाले. फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत एकूण ११७ जागांपैकी ९२ जागांवर बाजी मारत आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली.