मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकजवळ भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, धुळ्याच्या नगरसेवकाचा समावेश 

नाशिकमधील चांदवडजवळ कार -कंटेनरचा हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून यात एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे.

    नाशिक : गेल्या काही दिवसापासून राज्यात रस्ते अपघातच्या घटना सातत्याने घडत आहे. समृध्दी महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. आता मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway Accident) एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकमधून (Nashik)  चांदवडजवळ (Chandwad) कार -कंटेनरच्या भीषण अपघात झाला आहे.  या अपघाता चार जणांचा मृत्यू झाला असून यात एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रा समोर हा अपघात झाला. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील (Dhule) रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. यात कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्येधुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांचाही समावेश आहे. त्यांच्या अपघाती मृत्युच्या बातमीने घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    कसा झाला अपघात

    धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह तीन जण कारने कारमधून नाशिकहून धुळ्याकडे चालले होते. मुंबई-आग्रा महामार्गावर नमोकार तीर्थक्षेत्रा समोर सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता समोरुन येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. त्यामुळे कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील मृतांची अजून ओळख पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.