1 April

व्यापाऱ्यांनी(inflation) १ एप्रिलपासून दुधाची किंमत(milk prize hike) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिलिटर दुधासाठी आता ३ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. १ एप्रिल २०२१पासून टेलिव्हिजनची किंमत(television prize will be high) २००० ते ३००० रुपयांपर्यंत वाढू शकते. गेल्या ८ महिन्यांत, दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले आहेत.

    दिल्ली:  येत्या १ एप्रिलपासून सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. पुढील आठवड्यात दूध, एअर कंडिशनर (एसी), फॅन, टीव्ही, स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहेत.

    व्यापाऱ्यांनी १ एप्रिलपासून दुधाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिलिटर दुधासाठी आता ३ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. १ एप्रिल २०२१पासून टेलिव्हिजनची किंमत २००० ते ३००० रुपयांपर्यंत वाढू शकते. गेल्या ८ महिन्यांत, दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले आहेत.

    १ एप्रिल २०२१ पासून टीव्हीची किंमत कमीत कमी २ ते ३ हजार रुपयांनी वाढेल. या वर्षाच्या उन्हाळ्यात एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपणास मोठा धक्का बसू शकेल. एप्रिलपासून एसी कंपन्या किंमती वाढवण्याच्या विचारात आहेत. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे कंपन्या एसीच्या किंमतीत वाढ करण्याची तयारी करत आहेत. एसी बनवणाऱ्या कंपन्या किंमतीत ४ ते ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच, प्रतियुनिट एसीची किंमत १५०० रुपयांवरून २००० रुपयांपर्यंत वाढू शकते. याचबरोबर, १ एप्रिलपासून एव्हिएशन सिक्युरिटी फी वाढणार असल्यामुळे विमान प्रवासाही महागणार आहे. १ एप्रिलपासून देशांतर्गत उड्डाणांसाठी विमान वाहतूक सुरक्षा फी २०० रुपये असेल. सध्या ते १६० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांबद्दल बोलताना याकरिता फी ५.२ वरून १२ डॉलरपर्यंत जाईल. हे नवीन दर १ एप्रिल २०२१ पासून जारी केलेल्या तिकिटांवर लागू होतील.