inflation

एक फेब्रुवारीपासून 6 मोठ्या नियमांत बदल होणार आहेत. याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. यामध्ये ज्यांनी अद्याप फास्टॅग केवायसी करण्याचे काम पूर्ण केलेले नाही. त्यांचे फास्टॅगवर बंदी किंवा ते काळ्या यादीत टाकले जाणार आहेत.

    नवी दिल्ली : एक फेब्रुवारीपासून 6 मोठ्या नियमांत बदल होणार आहेत. याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. यामध्ये ज्यांनी अद्याप फास्टॅग केवायसी करण्याचे काम पूर्ण केलेले नाही. त्यांचे फास्टॅगवर बंदी किंवा ते काळ्या यादीत टाकले जाणार आहेत. त्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसू शकतो. यासोबतच आणखी काही नियम बदल होणार असल्याने याची झळ थेट सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    जानेवारी महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू होईल. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी 6 मोठ्या नियमांत बदल होणार आहेत. दरम्यान, काही नियम व्यवहारिकदृष्ट्या हिताचे असल्याचे मानले जात आहे. फास्टॅग केवायसी अपडेट करावे. ज्यांनी अद्याप फास्टॅग केवायसीचे काम पूर्ण केलेले नाही. त्यांनी त्यांचे फास्टॅग 31 तारखेच्या आत केवायसी पूर्ण करून घ्यावे. अन्यथा फास्टॅगवर बंदी घातली जाणार आहे किंवा असे फास्टॅग काळ्या यादीत टाकले जाणार आहेत.

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी 31 जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यामध्ये आरबीआयने आता लाभार्थीचे नाव न जोडता तुमच्या बँक खात्यातून 5 लाख रुपये ट्रान्सफर करण्याची मुभा दिली आहे. गेल्या वर्षी एनपीसीआयने 31 ऑक्टोबरला याबाबत परिपत्रक जारी केले होते.